मार्था
बेथानीची मार्था बायबल मधील योहान आणि लूकच्या शुभवर्तमान मध्ये वर्णन केलेली एक आकृती आहे. आपल्या दोन बहिणी-भाऊ लाजरेस व बेथानीची मरीयासोबत, तिला जेरुसलेम जवळील बेथानी गावात राहत असलेल्या वर्णन केले आहे. येशूने तिचा भाऊ लाजरेस याच्या पुनरुत्थान करण्याचीची ती साक्ष होती.
बायबल मधील मार्थाचे वर्णन
[संपादन]मार्थाचे वर्णन बायबल मध्ये योहान[१] व लूक[२] या वर्तमानात आहे.
38 मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका खेड्यात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करून आदरातिथ्य केले.
39 तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली.
40 पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभु, माझ्या बहिणीने सर्व काम माइयावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”
41 प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस.
42 पण एक गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो कारण मरीयेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.” -लूक १०:३८-४२
20 जेव्हा मार्थाने ऐकले की, आपल्या घरी येशू येत आहे तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली, पण मरीया घरातच राहिली.
21 ‘प्रभु’ मार्था येशूला म्हणाली, “तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता, 22 पण मला माहीत आहे की, तू जे मागशील ते देव तुला देईल.” 23 येशू म्हणाला, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” 24 मार्था म्हणाली. “मला माहीत आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल.” 25 येशू तिला म्हणाला, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल.-योहान ११:२०-२५
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "योहान - John 11 : मराठी बायबल - नवा करार". www.wordproject.org. 2018-03-10 रोजी पाहिले.
- ^ "लूक - Luke10 : मराठी बायबल - नवा करार". www.wordproject.org. 2018-03-10 रोजी पाहिले.