रफल
रफल | |
---|---|
फ्रान्स हवाई दलाची उडणारी दोन रफल विमाने | |
प्रकार | हलके लढाऊ विमान |
उत्पादक देश | फ्रान्स |
उत्पादक | |
पहिले उड्डाण | ४ जुलै १९८६ |
समावेश | फ्रान्स हवाई दल, फ्रान्स नौदल |
सद्यस्थिती | फ्रान्स हवाई दलात. |
मुख्य उपभोक्ता | फ्रान्स |
एकूण कार्यक्रमखर्च | ४० दशलक्ष युरो |
रफल हे फ्रान्सने विकसित केले अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. हे दोन इंजिने असलेले त्रिकोनी पंखाचे विमान आहे.
इतिहास
[संपादन]युरोफायटर टायफून या प्रकल्पाची इ.स. १९७० मध्ये सुरुवात होतांना यात फ्रान्सही सामील होता. परंतु फ्रान्सला युरोफायटर टायफूनपेक्षाही हलके विमान हवे होते. शिवाय त्या विमानाने अणुस्फोटके वाहून नेली पाहिजेत अशीही अट होती. विमानाचे वजन किती असावे यावरून फ्रान्सचे इतर देशांशी फाटले आणि त्यांनी रफलचा विमानांचा संसार थाटला. सुरुवातीला रफल एची निर्मिती झाली मग रफल बी प्रत्यक्षात आले. हे विमान फ्रान्सच्या हवाई दलाप्रमाणेच फ्रान्सच्या आरमारालाही हवे होते. कारण त्यांची तत्कालीन विमाने मोडीत काढण्याची वेळ आली होती. मग या दोन विभागांनी मिळून हा प्रक्ल्प करायला घेतला.
स्वरूप
[संपादन]या विमानाला दोन इंजिने आहेत. याचाही आकार डेल्टा विंग म्हणजे त्रिकोनी पंखाचा आहे. या विमानातही कार्बन धागे आणि इतर साहित्य वापरले जाते. हे विमानही रडार आपले अस्तित्त्व पुसट करू शकते. अतिशय वेगवान त्रिमितीय नकाशे या विमानात उपलब्ध होऊ शकतात. तसेच प्रहार झाल्यास त्याचा आगाऊ प्रतिभेद करण्याची क्षमता या विमानात आहे. या विमानाची रडार अतिप्रगत इलेक्ट्रोनिक तंत्रज्ञान आणि लपण्याची क्षमता याचीच किंमत जास्त आहे. हे विमान भरपूर दारूगोळा घेऊन उडू शकते. याच विमानाचा भाऊ रफल एम हा फ्रेंच आरमारात वापरात आहे. एकाच प्रकारचे विमान हवाईदल आणि आरमारात वापरता येणे हा चांगला भाग या विमानाच्या वापरात आहे.
तांत्रिक बाबी
[संपादन]- चालक दल: २
- लांबी: १५.२७ मीटर (५०.१ फुट)
- पंखांची लांबी : १०.८० मीटर(३५.४ फुट)
- उंची : ५.३४ मीटर (१७.५ फुट)
- पंखांचे क्षेत्रफळ: ४५.७ मी² (४९२ फुट²)
- विमानाचे वजन: १०,१९६ किलो
- भारासहित वजन : १४,०१६ किलो (३०,९०० पाउंड)
- कमाल वजन क्षमता : २४,५०० किलो
- इंधन क्षमता :४७०० किलो
- कमाल वेग :
- अति उंचीवर: मॅक १.८+ (२,१३०+ किमी/तास)
- कमी उंचीवर: १३९० किमी/तास
- पल्ला: ३,७००+ किमी
- प्रभाव क्षेत्र: १८५२+ किमी
- बंदुक : ३० मिमी
- उडताना समुद्रसपाटीपासुन उंची : १५ किमी
वापर
[संपादन]नाटो राष्ट्रांनी इ.स २०११ मध्ये लिबिया विरुद्ध केलेल्या हल्ल्यात या विमानांचा वापर करण्यात आला.
भारताची खरेदी
[संपादन]इ.स २०११ मध्ये भारताने फ्रान्सला या विमानांच्या प्रात्यक्षिकासाठी आमंत्रित केले होते. फ्रान्स शिवाय हे विमान अन्य कोणत्याही देशाकडे नाही.
इतरत्र वापर
[संपादन]सौदीने हे विमान घेण्याची तयारी दाखवली होती पण त्यांना यापेक्षाही आधुनिक तंत्रज्ञान हवे होते म्हणून हा करार झाला नाही.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- दसौल रफल अधिकृत आंतरजालीय दुवा (भाषा:फ्रेंच)
- दसौल रफल युएसेएस एंटरप्राइज या जहाजावर (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
- दसौल रफल कामगिरीची माहिती (भाषा:इंग्रजी)
- दसौल रफल[permanent dead link] (भाषा:इंग्रजी)
- दसौल रफल (भाषा:इंग्रजी)
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ९, २०१२ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- दसौल रफल फायटर प्लेन्स या स्थळावर माहिती Archived 2012-05-14 at the Wayback Machine. (भाषा:इंग्रजी)
- दसौल रफल (भाषा:इंग्रजी)
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जानेवारी १७, २००६ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)