वंगारी मथाई
वंगारी मथाई | |
---|---|
वंगारी मथाई | |
जन्म नाव | वंगारी मुता मथाई |
जन्म |
एप्रिल १, इ.स. १९४० इहिथे गाव |
मृत्यू |
सप्टेंबर २५, इ.स. २०११ नैरोबी |
राष्ट्रीयत्व | केनियन |
कार्यक्षेत्र | समाजसेवक,पर्यावरणवादी ,राजनीतिक कार्यकर्ता |
पुरस्कार | नोबेल शांति पुरस्कार ,जवाहर लाल नेहरू पुरस्कार |
वंगारी मुता मथाई , अर्थात वंगारी मथाई (एप्रिल १, इ.स. १९४० - सप्टेंबर २५, इ.स. २०११)एक केनियन पर्यावरणवादी आणि राजनीतिक कार्यकर्ता होत्या.त्यांनी अमेरिका आणि केन्या मधून उच्च शि़क्षण घेतले.१९७० च्या दशका मध्ये मथाईनी हरितपट्ट आंदोलनाची मुळे रोवून वृ़क्षारोपण,पर्यावरण संरक्षण आणि स्त्रियांचे अधिकारांकडे लक्ष दिले. २००४ मध्ये "सतत विकास, लोकतंत्र आणि शांतिसाठी दिलेले योगदान" या मुळे नोबेल शांति पुरस्कार मिळविणारी पहिली आफ्रिकन महिला आणि पहिली पर्यावरणवादी बनली. वर्ष २००५ मध्ये यांना जवाहर लाल नेहरू पुरस्काराने सन्मानित केले गेले.
जीवन
[संपादन]त्यांनी १९७७ मध्ये आपली पर्यावरण विषयक मोहिम सुरू केली.नैरौबी विद्यापीठातून त्यांनी 1971 साली डॉक्टरेट प्राप्त केली होती. ही पदवी प्राप्त करणाऱ्या पूर्व आफ्रिकेतील त्या पहिल्याच महिला होत्या. वंगारी मथाई यांचा जन्म केन्यातील नैरी येथे १९४० मध्ये झाला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येथील स्थानिक शाळेमध्येच झालं स्लोलास्टिका येथील महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झालं त्यानंतर पिटसबर्ग विद्यापिठामध्येही त्यांनी काही धडे घेतले मात्र पुन्हा त्या केन्याच्या नैरोबी विद्यापिठात संशोधन सहाय्यक म्हणून आल्या. बायोलॉजी सायन्समध्ये पीएच.डी करणाऱ्या त्या आफिकेतल्या पहिल्याच महिला होत्या. यानंतर आपल्या कार्यक्षेत्रातील अनेक टप्पे गाठत त्या पर्यावरणमंत्री झाल्या. पण पर्यावरणमंत्री झाल्या म्हणून काही त्यांची वाट सुकर झाली असे नाही. पर्यावराण हा मुद्दा विकासाच्या विरोधी आहे. त्यामुळे पर्यावरणवादी म्हणजे विकासाला विरोध करणारे असे मानुन आजवर अनेकांना अनंत अंडचणींना सामोरे जावे लागले मथाई देखील त्यातून सुटल्या नाहीत, मात्र प्रसंगी विरोध सहन करून आपल्या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या.
कार्य
[संपादन]- केन्याचा जागतिक ख्यातीचा चेहरा असलेल्या मथाई यांना विज्ञान व सामाजिक चळवळीमध्ये केलेल्या कामाबद्दल २००४ साली 'नोबेल' पुरस्कार देण्यात आला.
- मथाई यांनी पर्यावरण रक्षणासाठी सुरू केलेल्या 'ग्रीन बेल्ट' चळवळीमध्ये गेल्या ३० वर्षांत ३ कोटी वृक्षांचे रोपण करण्यात आले आणि हे मोठे कार्य त्यांनी गरीब महिलांमध्ये प्रबोधन करून घडवून आणले.
- ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्यांनाही केवळ विशिष्ट वर्गातील उच्चभ्रू चर्चांपुरते मर्यादित न ठेवता सामान्य माणसांना पर्यावरणवादी चळवळीत सक्रिय करण्याचे महान कार्य केले.
- १९७० च्या दशकात केन्यातील रेड क्रॉसचे नेतृत्व केले होते.
- केन्याच्या बाहेर आफ्रिकेतील कांगो बेसिन जंगल वाचवण्यासाठी ही त्यांनी प्रयत्न केले होते.
राजकिय सहभाग
[संपादन]सामाजिक चळवळी सोबत त्यांचा राजकारणात सहभाग होता. २००२मध्ये त्या संसद सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांना सहायक पर्यावरण मंत्री पद देण्यात आले होते. २००३ ते २००७ या कालावधीमध्ये त्या या पदावर होत्या.
“ | Maathai stood up courageously against the former oppressive regime in Kenya. Her unique forms of action have contributed to drawing attention to political oppression—nationally and internationally. She has served as inspiration for many in the fight for democratic rights and has especially encouraged women to better their situation. | ” |
—The Norwegian Nobel Committee, in a statement announcing her as the 2004 Nobel Peace Prize |
पुरस्कार
[संपादन]- मथाई यांनी महिलांच्या अधिकारासाठी मोठी लढाई लढली होती.केन्याचा जागतिक ख्यातीचा चेहरा असलेल्या मथाई यांना विज्ञान व सामाजिक चळवळीमध्ये केलेल्या कामाबद्दल २००४ साली 'नोबेल' पुरस्कार देण्यात आला.
- मथाई यांना भारत सरकारने 2006 साली इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान केला होता.
निधन
[संपादन]कर्करोगाच्या आजाराने ७१ व्या वर्षी नैरोबी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
नोबल पुरस्कार
[संपादन]शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कांराचं स्वरूप एक कोटी स्वीडिश क्रोनर म्हणजे साधारणपणे १० लाख ३० हजार अमेरिकन डॉलर असते. असं अनेकांना कळल्यावर त्या एवढया पैशाचं काय करणार हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला मात्र मथाईना या पैशाचं काय करायचं हे माहिती होतं. त्या म्हणाल्या पहिल्यांदा या रकमेचं व्यवस्थापन करणार. त्यातील रक्कम पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रकल्पावर खर्च केली जाईल. मात्र सर्वात आधी या रकमेतुन मक्याची पोती खरेदी केली जातील. कारण भूकेलेल्या पोटी या कार्यात साथ देणाऱ्या जनतेची ती आज गरज आहे.असे त्यांचे मत होते.
“ | When I see Uhuru Park and contemplate its meaning, I feel compelled to fight for it so that my grandchildren may share that dream and that joy of freedom as they one day walk there. | ” |
— स्रोत-वंगारी मुता मथाई– 'Unbowed: A Memoir' या पुस्तकाती पृष्ठ क्रं १९२. |
प्रकाशने
[संपादन]खालील पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत.
- The Green Belt Movement: sharing the approach and the experience (१९८५)
- The bottom is heavy too: even with the Green Belt Movement : the Fifth Edinburgh Medal Address (१९९४)
- Bottle-necks of development in Africa (१९९५)
- The Canopy of Hope: My Life Campaigning for Africa, Women, and the Environment (२००२)
- Unbowed: A Memoir (२००६)
- Reclaiming rights and resources women, poverty and environment (२००७)
- Rainwater Harvesting (२००८)
- State of the world's minorities 2008: events of 2007 (२००८)
- The Challenge for Africa (२००९)
- Replenishing the Earth (२०१०) ISBN 9780307591142