सौदी अरेबियाचा अब्दुल्ला
अब्दुल्ला बिन अब्दुलअझीझ अल सौद | |
सौदी अरेबियाचा राजा
| |
कार्यकाळ १ ऑगस्ट २००५ – २३ जानेवारी २०१५ | |
मागील | फह्द |
---|---|
पुढील | सलमान |
जन्म | १ ऑगस्ट, १९२४ रियाध |
मृत्यू | २३ जानेवारी, २०१५ (वय ९०) रियाध |
वडील | अल-सौद |
धर्म | सुन्नी इस्लाम |
अब्दुल्ला बिन अब्दुलअझीझ अल सौद (अरबी: عبدالله بن عبدالعزيز آل سعود; १ ऑगस्ट १९२४ - २३ जानेवारी २०१५) हा पश्चिम आशियातील सौदी अरेबिया देशाचा राजा होता. ऑगस्ट २००५ साली मोठा भाऊ व तत्कालीन राजा फह्द ह्याच्या मृत्यूनंतर राज्यपदावर आलेला अब्दुल्ल्ला जानेवारी १९९६ ते ऑगस्ट २००५ दरम्यान राज्यगादीचा वारसदार व कार्यवाहू राष्ट्रप्रमुख (Regent) होता.
१ ऑगस्ट १९२४ रोजी रियाध येथे जन्मलेला अब्दुल्ला राजा अल-सौदचा दहावा मुलगा होता. १९६३ साली अब्दुल्लाला सौदी लष्करप्रमुखपदी नियुक्त करण्यात आले. १९७५ साली राजा खालिदने अब्दुल्लाची सौदी अरेबियाच्या दुसऱ्या उपपंतप्रधानपदावर नियुक्ती केली. १९८२ मध्ये खालिदच्या मृत्यूनंतर अब्दुल्ला सौदी राजघराण्याचा युवराज बनला. १९९५ मध्ये राजा फह्दला आलेल्या हृदयघाताच्या झटक्यानंतर अब्दुल्ला सौदीचा कार्यवाहू राष्ट्रप्रमुख बनला.
अब्दुल्लाच्या कारकीर्दीमध्ये सौदी अरेबियाचे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण झाले. अब्दुल्लाने अमेरिका व ब्रितनसोबत सौदी अरेबियाचे संबंध बळकट केले. अब्दुल्लाने सौदी महिलांना मतदानाचा अधिकार दिला व खेळ स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची परवानगी दिली. २३ जानेवारी २०१५ रोजी अब्दुल्लाचे वयाच्या ९०व्या वर्षी न्युमोनियाने निधन झाले. त्याला अंदाजे ३० पत्नी व ३५ अपत्ये असल्याचे वृत्त आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |